नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांची प्रतिक्रिया…

रत्नागिरी – “नाणार आपलं आहे, नाणार राहणार तिथे येणारा प्रकल्प जाणार.” अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर दिली आहे.

उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी खासदार विनायक राउत यांच्या पुढाकारातून होत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिले. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान ‘नाणार’ प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलेत. तसंच आपला कोणत्याही प्रकल्पाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत, विकासाच्या आड शिवसेना येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मात्र जनतेला जे नको त्यासाठी विरोध करतच राहणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)