बुलडाणा ( uddhav thackeray live in buldana ) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज बुलडाणा दौऱ्यावर आहेत. बुलडाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करत आहेत. चिखली येथे संबोधित करताना उद्धव ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळत असून यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना, उद्धव ठाकरे यांनी वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी, ते मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणीवरून केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओ देखील दाखवला.
उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या या व्हिडिओमध्ये, देवेंद्र फडणवीस मध्यप्रदेश येथील वीज बिल माफीचा संदर्भ देत तत्कालीन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढताना दिसतायेत. हा व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यंत्री फडणवीस यांना, ‘जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा’ अशी जोरदार टीका केली.