सत्तेसाठी उद्धव ठाकरेंना सावरकरांचा विसर ? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लबोल

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरून भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी होती. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यानिमित्त सावरकरांना अभिवादन करण्यात आले नाही, यावरूनच नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी का, अशी टीका राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली. ट्विट करून राणे म्हणाले की, शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त @CMOMaharashtra आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी का, असा सवाल राणे यांनी केला.

काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त @CMOMaharashtra आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 27, 2021

यापूर्वी नारायण राणे यांनी पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणावरून देखील ठाकरे सरकारवर टीका केली होती. संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिरंगाई का, ते काय संत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच ऑडियो क्लीप उपलब्ध असताना कारवाई का नाही केली अस म्हणत त्यांनी या सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.