मुंबई – दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा करोनामुळे मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आपला आवाज कुणी दाबु शकत नाही, असा जन्माला देखील आला नाही. मला मी मुख्यमंत्री आहे, असे कधीच वाटू नये, मी पुन्हा येईन म्हणणारे, आता म्हणताहेत मी गेलोच नाही. नाही गेलो तर मग बसा तिथेच.’असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
यंदाचा दसरा मेळावा कमी लोकांमध्ये होत असला तरीही शिवसैनिकांमध्ये तोच जोश बघायला मिळत आहे. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार आहे हे बघायला मिळणार आहे. ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.