मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यापूर्वी उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधायचे मात्र त्यांनी शिवसेना भवनात येऊन माध्यमांशी सवांद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडताना शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता तर अडीच वर्षांपूर्वीच का नाही केलं ? हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांग होतो अमित शहा यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ असे सांगितले होते. मग त्यावेळेला ते मान्य का केला नाही ? मला का मुख्यमंत्री केले असा सवाल ठाकरे यांनी केला.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना आपल मत मांडल आहे. ते म्हणाले,’आम्ही कुठे वेगळा रस्ता निवडलाय? आम्ही तोच मार्ग निवडलाय. शिवसेना-भाजपाची युती होती.आम्ही एकत्र निवडणूक लढलो. आमच्याकडे सध्या शिवसेनेतील दोन तृतीयांशपेक्षा जास्त सहकारी आहेत. आम्ही भाजपासोबत आहोत.’ असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे.
दरम्यान, शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेचे आहोत. आम्ही हे सर्व हिंदुत्वासाठी करतोय असे सांगितले आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय असे देखील त्यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.