नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघांनी अलीकडे एकमेकांवर जोरदार टीका केला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. अशा शब्दात फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता दोघांमध्ये एक साम्य आहे, उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जी काय आपली पातळी आहे, ती वर ठेवली पाहिजे, आणि असं काही आलं की माझ्या पत्नीने त्याला उत्तर देणं टाळलं पाहिजे, पण हा त्या दोघांचा प्रश्न आहे. असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 1 मे रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकाच व्यक्तीवा गाता येतं, असं मला वाटत होतं. असा टोला त्यांनी लगावला होता. याला उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे
अमृता फडणवीसांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले होते त्या म्हणाल्या होत्या, मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात.