मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर गुरुवारी (दि.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.
Mumbai: Shiv Sena Chief Uddhav Thackeray takes charge as Maharashtra Chief Minister. pic.twitter.com/Q5D4AcoLOf
— ANI (@ANI) November 29, 2019