… म्हणून मी भाजपात : उदयनराजे

सातारा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले. जी काही विकास कामे झाली ती मी रेटून केली. त्यामुळे विकास की राजीनामा असे दोन पर्याय होते. त्यात मी विकासासोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपल्या पक्षांतराचे आज समर्थन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा रविवारी दुपारी सातारा येथे आली. त्यावेळी उदयन राजे बोलत होते. ते म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात मी नेलेली जनतेची कामे झालीच नाहीत. या कामांना कायम केराची टोपली दाखवली गेली, त्यामुळे कॉंग्रेस -राष्ट्रवादीला पक्षाची आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

उदयनराजे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सरकारची इच्छाशक्ती व नियोजन नसल्यामुळे विकास कामे झाली नाहीत. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यासाठी हजारो कोटींची कामे मार्गी लावली. जनता शेवटी कामाकडे पाहून मतदान करते. हे सरकार कामं मार्गी लावणारं सरकार आहे, म्हणूनच जनतेने या सरकावर विश्वास ठेवला. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्यावरून माझ्या मनात असलेल्या प्रश्नांच मला उत्तर मिळालं असल्याचेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

शिवेंद्रराजे म्हणालो, मंत्रिपदासाठी भाजपात गेलो नसून साताऱ्याच्या विकासासाठी मी भाजपात प्रवेश केला. कोणत्याही चौकशीला घाबरूनही आपण भाजपात गेलो नाही

Leave A Reply

Your email address will not be published.