गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाला उदयनराजेंचं समर्थन

मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे गड किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मात्र विरोधकांनी राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. परंतु आता या निर्णयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीच पाठिंबा दर्शविला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे म्हणालेत की, गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर माध्यमांनी चुकीचे वळण दिले आहे. मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून मला त्यांनी सरकारचे हे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले आहे.

सरकारच्या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाड्याने द्यावा असं म्हटले आहे. त्यामुळे मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नसल्याचं उदयनराजेंचं म्हणणं आहे.

त्याच बरोबर आपण देवळात लग्न लावत नाही का? असा प्रश्न देखील उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वासही उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.