उदयनराजेंची हॅट्ट्रिक,रणजितसिंहांची एंट्री

साताऱ्याचा गड राष्ट्रवादीने राखला
माढा काबीज करण्यात भाजपला यश

सातारा  – सातारा लोकसभा मतदारसंघात हॅट्ट्रिक साधण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार खा. उदयनराजे यशस्वी झाले तर चुरशीची लढत झालेल्या माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय प्राप्त करत संसदेत एंट्री केली आहे. खा. उदयनराजेंनीे सव्वा लाखांपेक्षा अधिक तर रणजितसिंह निंबाळकर 90 हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्‍क्‍य मिळवत विजयी झाले आहेत. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात व्हीव्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे अंतिम निकाल हाती येऊ शकला नाही.

निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंना 5 लाख 71 हजार 770 तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 46 हजार 692 मते प्राप्त झाली आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांना 40 हजार 303 मते मिळाली. माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना 5 लाख 82 हजार 705 तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना 4 लाख 97 हजार 778 मते प्राप्त झाली आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड.विजय मोरे यांना तब्बल 51 हजार 205 मते प्राप्त झाली आहेत.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी वखार महामंडळ गोदाम, औद्योगिक वसाहत येथे सकाळी 8 वाजता सुरू करण्यात आली. एकाच वेळी पोस्टल, सैनिकांची ईटीबीपीएस आणि ईव्हीएम मशिन मतांची मोजणी करण्यास सुरूवात करण्यात आली. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम मशिनच्या मत मोजणीसाठी 23 फेऱ्या निश्‍चित करण्यात आल्या होत्या. एक अपवाद वगळता सर्वच फेऱ्यांमध्य उदयनराजे आघाडीवर राहिले.

पहिल्या फेरीत उदयनराजेंना 29 हजार 896 तर नरेंद्र पाटील यांना 21 हजार 581, दुसऱ्या फेरीत उदयनराजेंना 28 हजार 655 तर नरेंद्र पाटील यांना 23 हजार 450, तिसऱ्या फेरीत उदयनराजेंना 24 हजार 868 तर नरेंद्र पाटील यांना 19 हजार 215, चौथ्या फेरीत उदयनराजेंना 28 हजार 314 तर नरेंद्र पाटील यांना 23 हजार 779, पाचव्या फेरीत उदयनराजेंना 30 हजार 260 तर नरेंद्र पाटील यांना 23 हजार 236, सहाव्या फेरीत उदयनराजेंना 23 हजार 176 तर नरेंद्र पाटील यांना 19 हजार 283, सातव्या फेरीत उदयनराजेंना 17 हजार 86 तर नरेंद्र पाटील यांना 14 हजार 830, आठव्या फेरीत उदयनराजेंना 11 हजार 200 तर नरेंद्र पाटील यांना 8 हजार 510, नवव्या फेरीत उदयनराजेंना 5 हजार 936 तर नरेंद्र पाटील यांना 5 हजार 571, दहाव्या फेरीत उदयनराजेंना 6 हजार 6654 तर नरेंद्र पाटील यांना 5 हजार 930, अकराव्या फेरीत उदयनराजेंना 5 हजार 207 तर नरेंद्र पाटील यांना 6 हजार 542 मते मिळाली.

बाराव्या फेरीत उदयनराजेंना 29 हजार 549 तर नरेंद्र पाटील यांना 27 हजार 875, तेराव्या फेरीत उदयनराजेंना 29 हजार 576 तर नरेंद्र पाटील यांना 26 हजार 547, चौदाव्या फेरीत उदयनराजेंना 35 हजार 144 तर नरेंद्र पाटील यांना 24 हजार 489, पंधराव्या फेरीत उदयनराजेंना 31 हजार 308 तर नरेंद्र पाटील यांना 25 हजार 528, सोळाव्या फेरीत उदयनराजेंना 30 हजार 917 तर नरेंद्र पाटील यांना 24 हजार 235, सतराव्या फेरीत उदयनराजेंना 24 हजार 865 तर नरेंद्र पाटील यांना 21 हजार 152, आठराव्या फेरीत उदयनराजेंना 18 हजार 68 तर नरेंद्र पाटील यांना 15 हजार 718, एकाणिसाव्या फेरीत उदयनराजेंना 10 हजार 502 तर नरेंद्र पाटील यांना 9 हजार 226, विसाव्या फेरीत उदयनराजेंना 12 हजार 358 तर नरेंद्र पाटील यांना 8 हजार 294, एकविसाव्या फेरीत उदयनराजेंना 6 हजार 823 तर नरेंद्र पाटील यांना 3 हजार 205, बावीसाव्या फेरीत उदयनराजेंना 8 हजार 484 तर नरेंद्र पाटील यांना 2 हजार 775, अखेरच्या तेवीसाव्या फेरीत उदयनराजेंना 3 हजार 168 तर नरेंद्र पाटील यांना 1 हजार 256 मते प्राप्त झाली होती. ही माहिती सायंकाळी सात वाजेपर्यंतची असून पोस्टल, ईटीबीपीएसची मतमोजणीची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here