भाजपाच्या मनधरणीला उदयनराजेंचा नकार !

सातारा: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात जाण्याचा चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपाच्या मनधरणीला राजेंचा नकार दिला. दरम्यान, राजेंच्या विरोधात आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील भाजपाकडून रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

मध्यंतरी उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणून जोरदार चर्चा रंगली होती. तसेच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. मात्र, उदयनराजे भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. पण त्यांना 2019 साली पुन्हा उमेदवारी द्यायला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत याचे पडसाद उमटले होते. सातारा जिल्ह्यातील एक गट त्यांच्या विरोधात आहे. विशेष म्हणजे सातारा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाच खा. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीस विरोध आहे. त्याच बरोबर विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाचा त्यांच्या नावाला विरोध आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here