उदयनराजे भोसले यांच्या विजयाचा कराडात जल्लोष 

कराड  – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारत जवळपास 1 लाख पेक्षा जादा मतांनी विजयी मिळविला. या विजयाचा कराड येथे राजेंद्रसिंह यादव मित्र परिवार समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. याशिवाय कराड व पाटण तालुक्‍यात ठिकठिकाणी खा. उदयनराजे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करीत आपला आनंद व्दिगुणीत केला.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हमखास यश मिळवून देणारा मतदार संघ म्हणून सातारा मतदार संघाचे नाव आवर्जून घेतले जाते. यावेळीही लोकसभा निवडणुकांच्या काळात कॉलर उडवण्याच्या खास शैलीमुळे उदयनराजे भोसले चर्चेत आले. या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून नवरंगी लढतीत विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात होते. मात्र खा. उदयनराजेंची लोकसभेतील हॅट्रिक करत आपली स्टायलिश कॉलर पुन्हा फडकवली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.