उदयनराजे भोसले 249952 मतांसह आघाडीवर

सातारा  – लोकसभा निवडणुकीच्या होणाऱ्या देशातील मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा असताना जिल्ह्यातील माढा आणि सातारा मतदारसंघांमधील निकाल काय व कसा लागतो, याची लोकांमध्ये उत्कंठा आहे. पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे यावेळी प्रथमच दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आपला बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी होणार की बालेकिल्ल्यावर युतीचा भगवा फडकवणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली असून सध्या उदयनराजे भोसले 249952 मतांसह आघाडीवर तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील 199794 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.