उदयनराजे यांच्या भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम?

कार्यकर्त्यांकडून नकारात्मक सूर : भूमिकेपासून “यु टर्न’

पुणे – भाजपमध्ये प्रवेश करणे आव्हानात्मक ठरण्याची शक्‍यता कार्यकर्त्यांनी मांडल्याने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भूमिकेपासून “यु टर्न’ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला “पूर्णविराम’ मिळण्याची शक्‍यता आहे. सोमवारी पुण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना भाजप प्रवेशाबाबत नकारात्मक सूर लावला होता. त्यानंतर त्यांनी भूमिका बदलल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील 15 दिवसांपासून उदयनराजे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांसमवेत बैठका घेऊन चाचपणी करत आहेत. सोमवारीही सातारा आणि पुण्यातील निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत उदयनराजेंनी बैठक घेऊन भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश करण्यासाठी नकारात्मक घंटा वाजवल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने उदयनराजेंना राजकीय भूमिका लवकर जाहीर करणासाठी दबाव येत आहे.

यामुळे भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत भाजप प्रवेश राजकीय धोका असल्याचे, पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी सोडल्यास उदयनराजेंना तगडे आव्हान
येत्या काही दिवसांत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यास त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर उदयनराजेंना पुन्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागेल. परिणामी, राष्ट्रवादीकडून उदयनराजेंसमोर कडवे आव्हान निर्माण होण्याची शक्‍यता आहे. कारण, गेल्या लोकसभेवेळी उदयनराजे राष्ट्रवादी सोडण्याच्या वावड्या उठल्याने सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे आणि इतर काही तगडी नावे चर्चेत आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)