उदयनराजे महाजनादेश यात्रेत सहभागी होणार

बारामती – माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजप प्रवेश केला आहे. दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, रविवारपासून (दि. 15) उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचेही प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी सांगितले. भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांसमवेत पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांना या वयात सोडून जाऊ शकत नाही. मात्र, उद्या तरूण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय बदलू शकतो, असे सांगत तूर्त “वेट अँड वॉच’ एवढीच भूमिका घेतली. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते आमदार आनंदराव पाटील व धैर्यशील कदम यांनीदेखील सावध भूमिका घेतली. तर माणमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जयकुमार गोरे यांना कडाडून विरोध दर्शविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)