बारामती -येथील मंगेश नाना मित्र परिवाराने खासदार उदयनराजे यांची सातारा येथे भेट घेतली. भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उदयनराजे दोघे एकत्र असलेली फोटो फ्रेम त्यांनी उदयनराजे यांना भेट दिली. बारामतीकरांच्या अनोख्या भेटीमुळे उदयनराजे देखील भारावून गेले होते. तर उदयनराजे यांनी त्यांच्या खास शैलीत बारामतीकरांचे स्वागत केले.
शरद पवार व स्वतः उदयनराजे यांची छबी असलेला फोटो भेट दिल्यानंतर उदयनराजे यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. आनंदाची एक लकेर त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मंगेश ओमासे व त्यांच्या मित्र परिवारासोबत दिवसातील काही वेळ उदयनराजेंनी घालविला. बारामतीला केव्हा येणार, अशी विचारणा मंगेश उमासे यांनी केली. क्षणाचाही विलंब न लावता बारामतीला ये भरारे डिझेल, असा असा डायलॉग उदयनराजे यांनी यावेळी मारला. त्यानंतर एकच हशा पिकला.