-->

उदयनराजे यांच्याकडून प्रशासनाला धक्क्यावर धक्के

सातारा ( प्रतिनिधी ) – खासदार उदयनराजे भोसले यांचे धक्कातंत्र अद्याप संपलेले नाही . आधी ग्रेडसेपरेटसचे उद्‌ घाटन केल्यावर -बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड़डाण पुलाला श्रीमंत छ्त्रपती प्रताप सिंह उर्फ दादासाहेब महाराज असा नामफलक झळकल्याने सातारकरांना आश्चर्याचा धक्का बसला . या दुसऱ्या धक्क्याची प्रशासनातही जोरदार चर्चा रंगली .

साताऱ्यातील ग्रेड सेप्रेटरचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उद्घाटन केल्यानंतर सारेच अवाक झाले. दरम्यान ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि.१९) रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाँम्बे रेस्टॉरंट पुलाला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब उड्डाणपूल असे नाव देणारा बॅनर लावला. यामुळे प्रशासनही अवाक झाले आहे.

उदयनराजे यांचा दृश्यम स्टाईल गनिमी कावा प्रशासनालाही गोंधळात टाकणारा ठरला आहे . अचानक मेडिकल कॉलेजच्या जागेची पाणी मग जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक नंतर पुन्हा ग्रेड सेपरेररची प्रशासनासह पाहणी या उदयनराजेंच्या धक्का तंत्रांनी राष्ट्रवादी सह प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना चांगलेच खिळवून ठेवले आहे .

खा. उदयनराजेंनी आठ दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटर सर्वांसाठी खुला केला. सातारकरांना त्यांचा सुखद धक्का बसला. दुर्दैवाने मात्र याचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक बॅनर फाटल्याने तणाव निर्माण झाला होता. अशातच मंगळवारी रात्री पुन्हा एकदा पुणे -बंगळूर महामार्गावरील सातारा पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या “बाँबे रेस्टोरंट” चौकातील कोरेगावकडून साताऱ्यात येणाऱ्या उड्डाण पुलाला रातोरात “श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब उड्डाणपूल” असे नामकरण केलेला बॅनर लागला.

यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात त्याची चर्चा रंगली आहे. उड्डाण पुलाच्या नामकरण कार्यक्रमाच्या रणनीतीवर राजे समर्थकांनी मात्र विलक्षण मौन बाळगले आहे .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.