उदयन राजेंचे तळ्यात मळ्यात पवारांना भेटले; चंद्रकांत पाटील मात्र आशावादी

पुणे, सातारा : भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा की नाही द्विधा मन:स्थितीत छत्रपती उदयनराजे सापडले आहेत. त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने राजे राष्ट्रवादीतच थांबतील अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी आणखी कार्यकर्त्यांशी बोलायचे आहे,असे सांगून वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेश खोळंबला आहे, अशी माहिती महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राजेंनी वेळ मागितला
उदयन राजे यांना यांना आणखी काही कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. त्यामुळे भाजपातील प्रवेशासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. त्यांच्याशी नियमितपणे संवाद सुरू आहे. त्यानंतर ते भाजपात येतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शरद पवार यांनी पुण्यात उदयन राजे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शशिकांत शिंदे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून जाऊ नये, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. राजे यांनी यावेळी कोणताही थेट शब्द दिला नसला तरी आपण पक्षातच राहू असे संकेत दिले, असे सुत्रांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत पुण्यात राजेंनी कार्यकत्याची बैठक घेतली होती. त्यात काही कार्यकर्त्यांनी भाजपात गेल्यास मान राहणार नाही. तसेच राजीनामा देऊन निवडणूक लढविणे सध्या गैरसोयीचे असल्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे या भूमिकेवर गांभीर्याने विचार करत राजे यांनी सावध पवित्रा घेतला आहे, असे समजते.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×