पिंपरी- साताऱ्याचे खासदार उदयनराजे नेहमीच आपल्या हटके शैलीसाठी चर्चेत असतात. असा काहीसा उदयनराजेंचा हटके अंदाज पुन्हा एकदा प्रचार सभेत पाहायला मिळाला आहे.
काल पिंपरीत पार्थ पवारांच्या प्रचारासाठी उदयनराजेंची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उदयनराजेंनी चक्क स्टेजवरूनच प्राण्याचा आवाज काढत ‘हा आवाज कोणाचा’ असा प्रश्न कार्यकर्त्यांना केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी चौकीदार म्हणत असं गंमतीशीर उत्तर दिलं. दरम्यान, यावेळी उदयनराजेंनी नोटबंदी आणि जीएसटी वरून भाजप सरकारवर सडकून टीका केली.