उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट

पुणे – सिनेमा क्षेत्रातील प्रसिध्द दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्रा गेल्या काही वर्षापासून सिनेक्षेत्रापासून दूर आहे. बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा हा यापूर्वी 2013 मध्ये धूम-3 या सिनेमात दिसला होता. त्यानंतर अजूनपर्यंत तो एकाही सिनेमात छोट्या भूमिकेतही दिसला नाही.

आता अचानकपणे उदय चोप्रा बद्दल धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. नुकतंच त्याने ट्विटरवर असं काही लिहिलं की ते वाचून त्याच्या फॉलोवर्सना धक्काच बसला आहे. उदयने यामध्ये नैराश्यग्रस्त असल्याचे सांगून मनात आत्महत्याचे विचार येत असल्याचे त्याने लिहिले आहे.

उदयने ट्विटरवर लिहिले की, ‘मी मान्य करतो की माझी तब्येत ठीक नाहीये. अजूनपर्यंत मी प्रयत्न करत आहे पण मला यश येत नाहीये.’

दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी माझं ट्विटर अकाउंट काही तासांकरिता डी-अक्टिवेट केलं होतं. असं वाटत होतं की मरणार आहे. मला वाटतं की आत्महत्या हा एक चांगला पर्याय आहे. मी लवकरच असं करू शकतो.’ हे ट्वीट पाहिल्यावर सोशल मीडियावर चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

काही वेळेनंतर हे दोन्ही ट्वीट डिलीट करण्यात आली होती. मात्र तोवर या ट्वीटचे अनेक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या या ट्वीटनंतर फॉलोवर्सना धक्का बसला आहे, त्यांनी फॉलोवर्सनी उदय सध्या नैराश्यग्रस्त असल्याचे म्हटले आहे.

उदय चोप्राला मुंबई पोलिसांकडून समज

Leave A Reply

Your email address will not be published.