दोहा – संयुक्त अरब अमिरातीचे नेते आणि आबुधाबीचे राजे शेख मोहम्मद बिन झ्यायेद अल नह्यान यांनी सोमवारी अचानक फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा होत असलेल्या कतारला भेट दिली. राजकीय कारणावरून गेल्या वर्षभरापासून कतारवर चार देशांनी बहिष्कार घातला होता. या बहिष्कारामुळे या प्रदेशातील देशांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभुमीवर अमिरातीच्या प्रमुख नेत्याने अचानक कतारचा दौरा करण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे.
शेख मोहम्मद यांनी कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल तानी यांच्या निमंत्रणावरून कतारला भेट दिली, असे कतारमधील सरकारी वृत्तसंस्तेने म्हटले आहे. कतार आणि अमिरातीमधील बंधुत्वाच्या नात्याच्या आधारावर ही भेट घडवून आणण्यात आली. शेख तमिम यांनी कतारमधील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शेख मोहम्मद यांचे भव्य स्वागत केले, असेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.
चार देशांचा कतारवर बहिष्कार
2017 पासून बहारीन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या चार देशांनी कतारवर बहिष्कार घातला आहे. या बहिष्कारामध्ये अमिरातीचे प्रमुख नेते शेख मोहम्मद यांचाच पुढाकार होता, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सौदी अरेबियाबरोबरच्या 87 किलोमीटरच्या सीमेवर खंदक खणणे आणि त्यामध्ये आण्विक कचरा भरण्याने हा तणाव अधिकच वाढला, असेही मानले जाते आहे.
South Korea vs. North Korea : उत्तर कोरियाच्या सीमेवरून तोफांचा मारा; दक्षिण कोरियाचा दावा
या कारणामुळे कुवेतच्या तत्कालिन राजांनी कतारच्या विरोधात जवळपास युद्ध पुकारले होते. इजिप्तमध्ये 2011 साली आणि अन्यत्र सत्तेवर आलेल्या इस्लामी राजवटीला कतारने विरोध केला होता. त्यामुळे अन्य देशांनी कतारवर बहिष्कर घातला होता.