यूएई फतवा काउंसिलची करोना लसीला संमती

दुबई – करोनाच्या लसीसाठी उपयुक्त असणाऱ्या जिलेटीनसाठी एका विशिष्ट प्राण्याच्या मासांचा वापर केला जात असल्याच्या बातम्या होत्या. त्यामुळे मुस्लिम राष्ट्रांमध्ये नाराजी होती. त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत संबंधित लसींना आक्षेप घेतला होता.

मात्र आता आलेल्या बातमीनुसार संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख यूएई फतवा काउंसिलने असा आक्षेप घेणे अयोग्य असल्याचे नमूद करत लसींच्या वापराला संमती दिली आहे.

लसीमंध्ये सामान्यत: एका विशिष्ट प्राण्याच्या जीलेटीनचा वापर केला जातो. त्यालाच मुस्लिम समुदायाचा आक्षेप होता. मात्र जेव्हा अन्य कोणता विकल्प अथवा पर्याय नसतो तेव्हा असा वापर करणे हराम नसल्याचे काउंसिलने म्हटले आहे.

काउंसिलचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या म्हणाले की, जर कोणता पर्यायच नसेल तर करोना लसीला इस्लामी बंदीपासून वेगळे ठेवले जाउ शकते. कारण आज लोकांचा जीव वाचवणे महत्वाचे असून त्याला पहिले प्राधान्य असले पाहिजे.

शिवाय या जीलेटीनचा उपयोग औषध म्हणून केला जाणार आहे, खाद्य पदार्थ म्हणून नाही, त्यामुळे त्याला आक्षेप घेण्याची आवश्‍यकता नसल्याचे काउंसिलने स्पष्ट केले आहे.  ज्या प्राण्याच्या जीलेटीनवरून लसीला आक्षेप घेतला जातो त्या प्राण्याचे मास इस्लाममध्ये अपवित्र मानले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.