दुबई : संयुक्त अरब अमिरातमध्ये राहणाऱ्या एक भारतीय पेटलेल्या घरातून पत्नीला वाचवताना 90 टक्के भाजला, अशी बातमी खलीज टाईम्सने दिली आहे.
केरळमधून आलेले अनील निनान हे यात गंभीर जखमी झाले असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. ते 90 टक्के भाजले आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून आम्ही सर्व जण त्यांना जीवन मिळो म्हणून प्रार्थना करत आहोत. मात्र त्यांच्या पत्नीची प्रकृती स्थीर आहे, असे त्यांचे निकटवर्तीय जुली यांनी सांगितले.
पत्नी अगदी किरकोळ म्हणजे 10 टक्के भाजल्या आहेत. त्या बऱ्या होण्याच्या मार्गावर आहेत. उम्म अल कुवेन येथे ते रहात असलेल्या अपार्टमेंटच्या कॅरिडोरमधील इलेक्ट्रिक बॉक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने पत्नीला वाचवण्यासाठी ते धावले. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या दाम्पत्याला एक चार वर्षाची मुलगी आहे.