#Prokabaddi2019 : वॉरियर्सविरुद्ध मुंबाचे पारडे जड

बंगाल वॉरियर्स विरूध्द यू मुंबा
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पाटणा
वेळ – रात्री 7-30 वा.

पाटणा – प्रो कबड्डी लीग स्पर्धेमध्ये आज पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि यू मुंबा आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे बंगाल वॉरियर्सला यू मुंबाविरुद्ध सर्वोच्च कामगिरी करावी लागणार आहे.

मुंबा संघाने गुजरात फॉर्च्युनजाएंटस संघावर सफाईदार विजय मिळविला आहे. या कामगिरीमुळे त्यांच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. सांघिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी ही लढत जिंकली होती.

त्यांच्या तुलनेत बंगालच्या खेळाडूंना अद्यापही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या खेळाडूंना खोलवर चढाया करण्यात फारसे यश मिळालेले नाही. पकडींमध्येही अपेक्षेइतका प्रभाव त्यांना दाखविता आलेला नाही. मुंबाविरुद्ध सामना जिंकणे सोपे नाही व त्यादृष्टीनेच त्यांना सामन्याच्या सुरुवातीपासूनच आत्मविश्‍वासाने खेळावे लागणार आहे.

बंगाल वॉरियर्स :

बलस्थाने – उत्साही युवा खेळाडूंवर भर, संयमपूर्ण खेळात माहीर.
कच्चे दुवे – पकडींवर नियंत्रण नाही, चढायांमध्येही अक्षम्य चुका.

यू मुंबा :

बलस्थाने – आक्रमक चढायांमध्ये माहीर, उत्कृष्ट सांघिक कौशल्य.
कच्चे दुवे – चढायांमध्ये घिसड घाई, शेवटच्या क्षणात नकळत चुका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.