डर्बन : भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेत झालेली १९ वर्षाखालील गटाची चौरंगी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात गुरूवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ६९ धावांनी पराभव करत विजय नोंदविला.ध्रुव जुरेल सामन्याचा मानकरी ठरला.
Congratulations to the India U19 boys who seal a 69-run victory over the SA U19s in the #U19QuadSeries final 🎉🎉
Dhruv Jurel is adjudged the Man of the match for his match-winning 101 💪💪 pic.twitter.com/XGQPkLzqOS
— BCCI (@BCCI) January 9, 2020
द.आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारलं होते. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २५९ धावा केल्या होत्या. भारताकडून फलंदाजीत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने ११५ चेंडूत १०१ धावांची तर ठाकूरने ७० आणि सिध्देश वीरने ३७ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्जेने १९ धावा देत ३ गडी बाद केले.
A brilliant 101 by Dhruv Jurel and a gritty 70 from Tilak Varma guide India U19 to a total of 259/7 after 50 overs in the final of the U19 Quadrangular Series.#U19QuadSeries pic.twitter.com/FtlLe7dpvq
— BCCI (@BCCI) January 9, 2020
विजयासाठी २५८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला ४३.१ षटकांत सर्वबाद १९० धावसंख्येपर्यतच मजल मारता आली आणि अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला. आफ्रिकेकडून फलंदाजीत लीसने ५२, जेए बर्डने ३९ धावांची खेळी केली. तर भारताकडून गोलंदाजीत अर्थवने सर्वाधिक ४, रवि बिश्णोईने २ आणि आकाश सिंह, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, सिध्देश वीर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Wicket. Two fall in quick succession, as Lees (52) launches one into the Durban sky with a comfortable catch taken. Veer with the wicket
Odirile Modimokoane is the last man in.
SA: 182/9 after 41.1 overs. #SAvIND #U19QuadSeries
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 9, 2020
दरम्यान, चौरंगी मालिकेत भारत-दक्षिणआफ्रिका शिवाय झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड संघाचा समावेश हेता. भारताने मालिकेतील तीन पैकी तीन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.