डर्बन : दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद शतकी तर यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षाखालील गटाच्या चौरंगी एकदिवसीय मालिकेतील दुस-या लढतीत झिम्बाब्वेचा ८९ धावांनी पराभव केला. भारताचा मालिकेतील हा सलग दुसरा विजय ठरला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३०१ धावा केल्या होत्या. भारताकडून दिव्यांशाने १३७ चेंडूत ११ चौकार व १ षटकारासह नाबाद १२८ आणि यशस्वी जैस्वालने ७८ आणि कुमार कुशाग्रने ४७ धावांची खेळी केली.
U19 Quadrangular Series – Innings Break: India U19 301-5 (50 overs)
(Divyaansh Saxena 128*, Yashasvi Jaiswal 78, Kumar Kushagra 47; Milton Shumba 1/43, Dion Myers 1/45, Tadiwanashe Nyangani 1/56, Wesley Madhevere 1/57)#FutureStars #ZIM19vIND19
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 5, 2020
प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाला ४९.५ षटकात सर्वबाद २१२ धावांपर्यतच मजल मारता आली. झिम्बाब्वेकडून फलंदाजीत माएर्सने ८३, मॅडेव्हेरने ४२ आणि टुग्वेटेने २६ धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत सुशांत मिश्राने ३७ धावांत ३ तर शुभंग हेगडेने ४० धावांत ३ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.