किम्बर्ली : मक्केंजिए हार्वेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा २ विकेटनी पराभव करत विजय संपादित केला आहे.
AUSTRALIA WIN!!!!!!!!#U19CWC | #AUSvENG | #FutureStars
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 23, 2020
आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंड संघास प्रथम फंलदाजीस पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सलामीवीर बेन चार्ल्सवर्थच्या ८२, जैक हेन्सच्या ३१, कसे एल्ड्रिजच्या नाबाद ३२ आणि डैन मूसलीच्या ५१ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून कोन्नोर सुलीने २ तर सिम्मो, स्काॅट, मर्फी, तनवीर आणि ओलीवर डावीसने प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात २५३ धावांचे आव्हान आॅस्ट्रेलियाने ५० षटकात ८ बाद २५३ धावा करत पूर्ण केले. आॅस्ट्रेलियाकडून मक्केंजिए हार्वे याने ६५, लचलान हेरने याने ४५ तर सैम फैनिंगने ३१ धावा केल्या. तर कोन्नोर सुलीने २० चेंडूत नाबाद ३५ आणि टाॅड मर्फीने १० चेंडूत नाबाद १६ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून ब्लेक कुलन, हमीदुल्लाह कादरी आणि लेविस गोल्डसवर्थीने प्रत्येकी २ गडी बाद केले.