#U19CWC : श्रीलंकेचा नायजेरियावर २३३ धावांनी विजय

पोशेस्ट्रूम : रविंदु रसंताच्या नाबाद शतकी खेळी आणि दिलशान मदुशंकाच्या ५ विकेटच्या जोरावर श्रीलंकेने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात नायजेरियावर  २३३ धावांनी विजय मिळविला. श्रीलंकेचा रविंदु रसंता सामन्याचा मानकरी ठरला.

नायजेरियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना रविंदु रसंताच्या १०२,  मोहम्मद शमाजच्या ५६, सोनल दिनुषाच्या ४३ आणि निपुण धनंजयच्या ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद ३०६ धावा केल्या होत्या. नायजेरियाकडून रशीद अबोलारिनने २ तर पीटर आहो, अब्दुलरहमान आणि मिराकल अखिबगेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

त्यानंतर ३०७ धावांचा पाठलाग करताना नायजेरियाचा डाव अवघ्या ७३ धावांवर संपुष्टात आला. नायजेरियाकडून अब्दुलरहमान जिमोहने सर्वाधिक १५ धावा केल्या. अब्दुलरहमान शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने ७.३ षटकांत ३६ धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. चमिंदु वीजेसिंघेने २ आणि कविन्दा नदीशनने ३ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.