पोट्चेस्ट्रूम (द.आफ्रिका) : श्रीलंकेने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील ‘क’ गटातील साखळी सामन्यात जपानचा ९ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला आहे.
Sri Lanka register their first win of the tournament.
They register a professional nine wicket win over Japan in Potchefstroom.#U19CWC | #SLvJPN | #FutureStars pic.twitter.com/kqsjos0nh5
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 25, 2020
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना जपान संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. श्रीलंकेच्या प्रभावी गोलंदाजीसमोर जपानचा डाव १८.३ षटकात ४३ धावसंख्येवर संपुष्टात आला होता. जपानच्या एकाही फलंदाजांला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. देबाशीष साहू याने सर्वाधिक ९ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मंदुशका, सुदीरा तिलकरतने, आशियान डेनियल आणि नवोद परानाविथाना यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
Clinical from Sri Lanka in the field.
They bowl Japan out for 43 as four different bowlers take two-fors.#U19CWC | #SLvJPN | #FutureStars pic.twitter.com/NCcpDY1lki
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 25, 2020
प्रत्युत्तरात श्रीलंकेने विजयासाठीचे ४४ धावांचे आव्हान ८.३ षटकात १ बाद ४७ धावा करत पूर्ण केलं. यामध्ये १२ अतिरिक्त धावांचा समावेश होता. श्रीलंकेकडून नवोद परानाविथानाने ९, मोहम्मद शमाजने नाबाद ७ आणि रविंदु रसंताने नाबाद १९ धावांची खेळी केली. जपानकडून केंटो डोबेलने १ गडी बाद केला.