#U19CWC : वेस्टइंडिजवर मात करत न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक

बेनोनी (द.आफ्रिका) : जाॅए फील्ड आणि क्रिस्टियन क्लार्क  यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ८६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वेस्टइंडिजवर २ विकेटनी विजय मिळवित उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. क्रिस्टियन क्लार्क सामन्याचा मानकरी ठरला.

वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना किर्क मैकेंजीच्या ९९, केवलन एंडरसनच्या ३३ आणि एंटोनियो माॅरिसच्या ३१ धावांच्या जोरावर ४७.५ षटकांत सर्वबाद २३८ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून क्रिस्टियन क्लार्कने सर्वाधिक ४ तर जाॅए फिल्ड आणि जेसी ताश्कआॅफ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २३९ धावांचे आव्हान ४९.४ षटकांत ८ बाद २३९ धावा करत पूर्ण केले. न्यूझीलंडकडून रियास मारियूने २६, फर्गस लेलमैनने २९, क्विन सन्डेने ३२, सिमन कीने याने ३३, जाॅए फिल्डने नाबाद ३८ आणि क्रिस्टियन क्लार्कने नाबाद ४६ धावांची खेळी करत विजय मिळवला. वेस्टइंडिज संघाकडून एशमेड नेडने ३, जोशुआ जेम्स आणि मैथ्यू फोर्डे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.