जोहान्सबर्ग : भारतीय कर्णधार प्रियम गर्ग आणि तिलक वर्मा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर व गोलंदाज कार्तिक त्यागीच्या ३ विकेटच्या जोरावर भारताच्या १९ वर्षाखालील संघाने झिम्बाब्वेविरूध्दच्या विश्वचषकातील वार्मअप सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला.
https://twitter.com/ICCLive/status/1217111759598780417?s=19 भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्वबाद २९५ धावा केल्या होत्या. यामध्ये तिलकने ७७ चेंडूमध्ये ८ चौकार व २ षटकांरासह ७३ तर प्रियमने ५७ चेंडूमध्ये ३ चौकार व ६ षटकांरासह ७३ धावा केल्या. तर कुमार कुशाग्रने ३६, अथर्व अंकोलेकरने नाबाद ३१ आणि रवि बिश्णोईने १९ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला ४८.४ षटकांत सर्वबाद २७१ धावसंख्येपर्यत मजल मारता आली आणि २३ धावांनी पराभव स्विकारावा लागला. झिम्बाब्वेकडून फलंदाजीत शेंडेनडाॅर्फने सर्वाधिक ८१, ओल्डनाऊने ६६ तर शुंबाने ५२ धावा केल्या. भारताकडून कार्तिक त्यागीने ३३ धावांत ३ गडी बाद केले. सुशांत मिश्रा आणि रवि बिश्णोईने प्रत्येकी २ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.