ब्लूफाँटेन : भारतीय युवा संघाने १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतील सुरूवातीचे दोन सामने जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज ‘क’ गटातील साखळी फेरीतील अखेरचा व तिसरा भारताचा सामना न्यूझीलंडविरूध्द होत अाहे. त्यामुळे स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखत गटात अव्वल राहण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.
Yashasvi Jaiswal hard at work ahead of #INDvNZ 🙌 #U19CWC | #FutureStars pic.twitter.com/U9twyNseYU
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 24, 2020
आजचा सामना दक्षिण आफ्रिकेतील मनगाँग ओव्हल, ब्लूफाँटेन येथे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे.
The Blackcaps hard at work ahead of their upcoming fixture against India 💪 #U19CWC | #FutureStars pic.twitter.com/S2vIR6s8mo
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 24, 2020
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या लढतीत श्रीलंकेवर ९० धावांनी तर दुस-या लढतीत जपानचा ४१ धावांत धुव्वा उडवत त्यांच्यावर दहा विकेटनी अवघ्या २९ चेंडूत मात केली होती. तर दुसरीकडे न्यूझीलंडने बुधवारी श्रीलंकेचा तीन विकेटनी पराभव केला होता.