पोटचेस्टरूम (द. आफ्रिका) : बांगलादेशने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘क’ गटातील सामन्यात स्काॅटलंड संघाचा ७ विकेट राखून पराभव केला आहे.
ICC U-19 Cricket World Cup South Africa 2020
Bangladesh U-19 won by 7 wickets #BCB #BANU19vSCOU19 pic.twitter.com/4EjBZiFrfd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 21, 2020
स्काॅटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३०.३ षटकांत सर्वबाद ८९ धावा केल्या होत्या. स्काॅटलंडकडून फलंदाजीत सैय्यद शाहने २८, जेमी केयनर्सने १७ आणि एंगस गाएने ११ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजीत रकीबुल हसनने २० धावांत सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर शोरिफुल इस्लाम आणि तंजीम हसन शाकिबने प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात ९० धावांचे आव्हान बांगलादेशने १६.४ षटकांत ३ बाद ९१ धावा करत पूर्ण केले. बांगलादेशकडून परवेज होसैन एमनने २५ तर तौहिद हदयने नाबाद १७ आणि महमुदुल हसन जाॅयने नाबाद ३५ धावांची खेळी केली. स्काॅटलंडकडून शौन फिशर काॅफने ४ षटकांत २७ धावा देत ३ गडी बाद केले.