पाॅटचेफस्ट्रूम : गोलंदाजांच्या अचूक मा-यानंतर महमुदुल हसन जाॅयच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडवर सहा विकेटनी मात करून १९ वर्षाखालील वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महमुदुल हसन जाॅय सामन्याचा मानकरी ठरला. आता बांगलादेशची जेतेपदासाठी ९ फेब्रुवारीला भारताशी लढत होईल.
ICC U-19 Cricket World Cup South Africa 2020
Semi-FinalBangladesh U-19 won by 6 wickets#BCB #BANU19vNZU19 pic.twitter.com/9DDUGz72KT
— Bangladesh Cricket (@BCBtigers) February 6, 2020
न्यूझीलंडने दिलेले २१२ धावांचे विजयी लक्ष्य बांगलादेशने ४ विकेटच्या मोबदल्यात ४४.१ षटकांत २१५ धावा करत पूर्ण केले. बांगलादेशकडून महमुदुल हसन जाॅयने १२७ चेंडूत १३ चौकारासह सर्वाधिक १०० धावांची खेळी केली.तौहिद ह्रदयने ४०(४७) आणि शहादत होसैनने नाबाद ४०(५१) धावांची महत्वपूर्ण खेळी केली. न्यूझीलंडकडून क्रिस्टियन क्लार्क, डेविड हैनकाॅक, आदित्य अशोक आणि जेसी ताश्कआॅफ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
ICC U19 Cricket World Cup South Africa 2020
Semi-FinalBangladesh U19 need 212 runs to win#BCB #BANU19vNZU19 pic.twitter.com/76M7jy1yPI
— Bangladesh Cricket (@BCBtigers) February 6, 2020
बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २११ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बेखम वीलर ग्रीनआॅल याने सर्वाधिक नाबाद ७५(८३) धावांची खेळी केली. निकोलस लिडस्टोनने ४४(७४), फर्गस लेलमैनने २४(५०) आणि ओली वाईटने १८(४३) धावांची खेळी केली.
In tough circumstances Beckham Wheeler-Greenall has looked in fine form.
His second 50 of the 2020 #U19CWC 👏 #NZvBAN | #FutureStars pic.twitter.com/3dnsA5HrdD
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 6, 2020
बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने १० षटकात ४५ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. शमीम होसैन आणि हसन मुरादने प्रत्येकी २ तर रकीबुल हसन याने १० षटकात ३५ धावा देत १ गडी बाद केला.