मुंबई : भारतीय मुलींच्या संघांला १७ वर्षाखालील गटाच्या तिंरगी फुटबाॅल स्पर्धेत सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. शुक्रवारी झालेल्या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत स्वीडनने भारतावर ३-० ने विजय संपादित केला.
FULL-TIME! We come to the end of the match, as Sweden take home the three points
🇮🇳 0-3 🇸🇪
📺: https://t.co/U8HZWBjb4R#INDSWE ⚔ #U17WomensFootball 🏆 #BackTheBlue 💙 #ShePower 👧 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/QBzIOtlGJY
— Indian Football Team (@IndianFootball) December 13, 2019
स्वीडनकडून माल्तीदा विन्बेर्ग हिने ४ थ्या मिनिटालाच गोल करत संघास १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इदा वेन्डेबर्गने २६ व्या मिनिटाला गोल करत सामन्याच्या पहिल्या सत्रापर्यत २-० अशी आघाडी कायम ठेवली.
सामन्याच्या दुस-या सत्रात भारताने गोल करण्याचा खूप प्रयत्न केला पण हाती अपयश आले. सामन्याच्या ९१ व्या मिनिटाला मोनिका जुसू बाह हिने गोल केला. स्वीडनने शेवटपर्यत ३-० अशी आघाडी कायम ठेवत सामना खिशात घालत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताची पुढील लढत मंगळवारी थायलंडविरूध्द होईल.