मुंबई : भारतीय मुलींच्या संघाने १७ वर्षाखालील गटाच्या तिंरगी फुटबाॅल स्पर्धेत मंगळवारी थायलंडचा १-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय महिलांची विजेतेपदासाठी गुरूवारी स्वीडनविरूध्द लढत होईल. स्वीडनने पहिल्या लढतीत भारताचा ३-० ने पराभव केला होता.
FULL-TIME ⌛
THROUGH TO THE FINALS 🙌
India triumph over Thailand 🇹🇭 to make it to the final of the #U17WomensFootball Tournament 🏆
🇹🇭 0⃣-1⃣ 🇮🇳
📺: https://t.co/AdyTbvd3BK#THAIND ⚔ #BackTheBlue 💙 #ShePower 👧 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/INuCTwZ9Jq
— Indian Football Team (@IndianFootball) December 17, 2019
सामन्यात भारताकडून क्रिटीना देवी हिने( ९१ मि.)एकमेव गोल केला. तिने विरोधी संघाची गोलकीपर पावरिसा होमीयामियेन हिच्या चुकीचा फायदा उठवत गोल केला. थायलंडला हीच चूक महागात पडली कारण सामना बरोबरीत सुटला असता तर त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहचला असता. क्रिटिनाने मारलेला फटक्याचा गोलकीपकला अचूक अंदाज आला नाही आणि बाॅल गोलमध्ये पोहचला.