लखनौ : भारत-अफगाणिस्तान दरम्यान झालेल्या एकोणीस वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानने भारतावर दोन विकेटनी विजय मिळवला. भारताने अखेरचा सामना गमावला असला, तरी मालिकेतील तीन सामने जिंकत त्यांनी याधीच मालिकेवर कब्जा केला होता.
Cricket: Afghanistan's U-19 team produced a two-wicket victory over India in a low-scoring fifth Youth ODI
The five-match series, though, ended 3-2 in favour of hosts India. pic.twitter.com/JwJZXNpo5u
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 1, 2019
भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत सर्वबाद १५७ धावा केल्या. भारताकडून फलंदाजीत विक्रांत भदोरियाने २९, कुमार कुशाग्रने २४ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत नूर अहमदने ३९ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले.
विजयासाठीचे १५८ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने ४७.३ षटकांत ८ विकेटच्या मोबदल्यात १६० धावा करत पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून फलंदाजीत असिफ मुसाझाईने सर्वाधिक ४२ तर इम्रानने ३१ धावा करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. भारताकडून गोलंदाजीत मानव सुतारने ३२ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले.