U-17 Sportsfield Trophy 2024 (Pune) :- स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अकादमीने क्रिकेट नेक्स्ट अकादमीला ८ गडी राखून पराभूत करताना स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
प्रथम फलंदाजी करणार्या क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाचा डाव ११७ धावांवर मर्यादित राहीला. वीर चोरडियाने ३३ धावांमध्ये ४ गडी टिपले. ध्रुविल चोरडीयाने ३ गडी बाद करताना वीरला सुरेख साथ दिली. क्रिकेट नेक्सकडून शुभम एम.ने ३६ धावा करताना चांगली लढत दिली.
U19 Asia Cup 2024 | पाकिस्तानचे भंगले स्वप्न, भारत आणि बांगलादेशमध्ये रंगणार विजेतेपदाची लढत…
विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावा स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमी संघाने १३.३ षटकांत पूर्ण करताना २ गडी गमावले. निशांत शेवाळे याने ५५ धावांची तर, सोहम मोहीते याने नाबाद २८ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.