संयुक्त राष्ट्रे आमसभेतून : देशातून 2025 पर्यंत क्षयरोगाचे निर्मुलन करण्याचे उाद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रेने याबाबत ठरवलेल्या काळापेक्षा हा कालावधी पाच वर्षांनी अधिक आहे. मात्र विकासाची काही ध्येय गाठायची असल्याने हा अधिकचा वेळ आम्ही घेत आहोत, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संयुक्त राष्ट्रेच्या आमसभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते.
मी सभेसाठी येताना संयुक्त राष्ट्रेत एक भित्तीपत्रक वाचले. प्लास्टिकचा वापर यापुढे नाही असे त्यावर लिहले होते. मला सांगायला आनंद होत आहे, आमच्या देशात आम्ही वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिक विरोधात मोहीम राबवली आहे. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाने मला आणि माझ्या सरकारला बहुमत दिले त्यामुळे मी सत्तेत बहुमत मिळवून आल्यानेच तुमच्यापुढे आहे.