पालघरमध्ये दोन तरुणांच्या आत्महत्या

पालघर – पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्‍यातील सारसी येथील विशाल ज्ञानेश्वर ठाकरे (वय 26 वर्ष) आणि कोने येथील धीरज नरेश अधिकारी (वय 22 वर्षे) या दोन तरुणांनी वेगवेगळ्या कारणास्तव एकाच दिवशी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

वाडा तालुक्‍यातील सारसी येथील विशाल ठाकरे हा विवाहित तरुण असून दीड महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता. विशालने आजारपणाला कंटाळून आणि मानसिक तणावाखाली सकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. तर कोने येथील धीरज अधिकारी या तरुणानेही विष प्राशन करुन आत्महत्या केली. धीरजच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.