आसाममध्ये दोन महिलांकडून 10 कोटींचे हिरे जप्त 

हेलकांडी  – हेलकांडी येथून 1 हजार 667 ग्रॅमचे कच्चे हिरे आसाम रायफल्स पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हिऱ्यांची बाजार भावानुसार सुमारे 10 कोटी रुपये किंमत आहे.

मोनिया संगमा आणि मिनाती संगमा असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आसामधील हेलकांडी येथून सुमारे 9 कि.मी. अंतरावरील मोनचेरा येथे पोलिसांना एका रिक्षाची तपासणी केली. या तपासणीत दोन महिलांकडील पिशवीमध्ये सुमारे 10 कोटी रुपयांचे कच्चे हिरे आढळून आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच जप्त केलेले हिरे लाला पोलीस स्टेशनच्या स्वाधिन करण्यात आले आहेत.

याप्रकरणी या महिलांची चौकशी केली असता मोनिया म्हणाली, मेघालय येथील एका खाणीमध्ये माझा चुलत भाऊ काम करतो. हे मौल्यवान हिरे त्यानेच मला विक्रीसाठी दिले होते. हे हिरे एका ग्राहकास देण्यासाठी मी चालले होते, अशी माहिती तिने पोलीस चौकशी वेळी दिली. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.