शिलॉंग – मेघालयात पूर्व खासी हिल जिल्ह्यात तुफानी पावसामुळे एका घरावर दरड कोसळून दोन महिला क्रिकेटपटू ठार झाल्याची घटना घडली आहे. रझिया अहमद आणि फिरोजिया खान अशी त्यांची नावे आहेत.
यातील रझिया या मेघालयाच्या टीमच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा खेळल्या आहेत तर फिरोजिया खान या स्थानिक पातळीवरील क्रिकेटपटू होत्या.
ज्या भागात या दरडी कोसळल्या त्याठिकाणचे अनेक नागरिकही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहेत. दरडी दूर करून तेथे जिल्हा प्रशासनाने बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, मेघालय क्रिकेट असोशिएशनने ठार झालेल्या या दोन्ही क्रिकेटपटूंच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गेल्या सोमवारपासून मेघालयात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून त्यातून राज्याच्या अनेक भागांत मोठे नुकसान झाले असल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.