नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच जीएसटी परिषदेकडून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
आपल्या घरांमध्ये पाईपद्वारे येणारा गॅस-PNG आणि टु-व्हीलर्सच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण GST परिषद नैसर्गिक गॅसला जीएसटी प्रणालीत आणण्याचा विचार करीत असून यामुळे पीएनजी गॅस अधिक स्वस्त होऊ शकते.
दुसरीकडे पीएनजी गॅस आणि टु-व्हीलर्सवंरील कराच्या दरात कपात करण्याची अपेक्षा आहे. जीएसटी परिषद हे महत्वाचे दोन्ही निर्णय येत्या 28 मे ला आपल्या बैठकीत घेऊ शकते. कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेनंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे.
येत्या 28 मे ची जीएसटी परिषदेच्या बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. सदर बैठकीत इनव्हर्टेड ड्युटीची रचना निश्चित करण्याच्या उपायांची घोषणा देखील केली जाऊ शकते.
या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या सेस कलेक्शनात घट होण्याच्या शक्यतेवर कम्पनसेशन सेसवर चर्चा केली जाऊ शकते. जीएसटी परिषदेची शेवटची बैठक गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती. मागील बैठकीत जीएसटी संकलन कमी करण्यासह केंद्राच्या कर्ज घेण्याच्या फॉर्म्युलावर आणि त्याच्या भरपाईवर चर्चा झाली होती.