कराड ( प्रतिनिधी ) :- कराड-पाटण रस्त्यावर आबईचीवाडी (ता.कराड) गावच्या हद्दीत चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेच्या असलेल्या ड्रेनेजच्या पाईपला त्याची धडक बसली . या धडकेत चालक कृष्णत हणमंत ढगाले (रा. साकुर्डी, ता. कराड) यांच्या डोक्यास मार लागल्याने ठार झाले.
हा अपघात आज (गुरुवार दि. 3 रोजी) दुपारी घडला. याप्रकरणी कुलदीप रतन जाधव यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, कृष्णत ढमाले आज (गुरुवार दि. 3 रोजी) दुचाकी (एम. एच. 11 ए.एम. 96 91 )घेऊन खोडशी येथील दूध संघात कामावरून घरी साकुर्डी येथे जाण्यासाठी निघाले होते. आबईचीवाडी गावच्या हद्दीत दत्त सर्व्हिसिंग सेंटरसमोर ते दुपारी तीन वाजता आले असता त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ड्रेनेजच्या पाईपला धडकली. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ते जागेवरच ठार झाले.या घटनेची नोंद कराड तालुका पोलिसात आहे.