निमगाव सावा – निमगाव सावा गावात सोमवारी (दि. 21)दुपारच्या 2 वाजताच्या सुमारास निमगाव सावा बस स्टॅंडवर दोन दुचाकीची एकमेकांना जोरात धडक झाली. धडक इतकी जोरात होती की, एक दुचाकीस्वार जवळपास 20-30 फुटापर्यंत लांब फेकला गेला.
दुसऱ्या दुचाकी वर असलेला चालक आणि मागे बसलेली महिला दोघेही दुचाकी खाली अडकून पडले. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. तर गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर जवळ असणाऱ्या नागरिकांनी तत्काळ अपघात ग्रस्तांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले. रहदारीच्या आणि वर्दळीच्या या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. यासाठी प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.