शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच 

पिंपरी – मागील काही दिवसांपासून शहरात सुरु असलेले दुचाकी चोरण्याचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे आज पुन्हा एकदा उघड झाले आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी व हिंजवडी परिसरात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरुन नेल्या असून याप्रकरणी गुरुवारी संबधीत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण प्रकाश जाधव (वय-28) यांनी पिंपरी येथील केएसबी चौकातील वालीया कंपनीच्या गेटसमोर लावलेली दुचाकी (क्र. एमएच 28/एच 9693) ही 29 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चोरुन नेली. तर चिंचवड येथील दिपक मोकिंद कंधारे (वय-25) यांची दुचाकी (क्र. एमएच 14/डीजी 9921) ही दि. 9 सप्टेंबर रोजी रात्री घराच्या पार्किंगमध्ये लावल्यानंतर अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.

यासोबतच काळेवाडी येथील धनंजय भारंबे (वय-47) यांची मोपेड दुचाकी ज्योतीबा गार्डन समोर लावली असता अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली. तसेच हिंजवडी फेज 1 येथूल शिवशंकर सावरप्पा तलाठी, काळेवाडी येथून अमित अदिक साळुंके यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.