सातारा – येथील सदरबझार परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील सदरबझार परिसरातील नवीन म्हाडा कॉलनीसमोरील रॉयलपर्ल अपार्टमेंटच्या पार्किंगमधून 18 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत प्रकाश शंकर माने (वय 61) रा. रॉयलपर्ल अपार्टमेंट, सदरबझार यांनी तक्रार दिली असून पोलीस हवालदार इष्टे या चोरीचा पुढील तपास करत आहेत.