पुणे – दुचाकी चोरुन त्यावर शहरात फिरणाऱ्या दोघांना फरासखाना पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली.
अतूल कांबळे (23), कबीर अडागळे (वय 24, दोघेही रा. पद्मावती) अशी चोरट्यांची नावे आहेत. फरासखाना हद्दीतून चोरी झालेल्या दुचाकींचा शोध पोलिसांकडून सुरू होता. रविवारी रात्री दुचाकीवरुन दोघेजण बुधवार पेठेतील आदिनाथ चौकाकडून गवळी आळीच्या दिशेने येत होते.
त्यांनी पोलिसांना पाहिल्यानंतर दुचाकी भरधाव चालवत तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवले. चौकशीअंती ही दुचाकी त्यांनी फरासखाना हद्दीतून चोरल्याचे सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार वैभव स्वामी, सयाजी चव्हाण, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, मोहन दळवी, ऋषिकेश दिघे, राकेश क्षीरसागर, मेहबुब मोकाशी, अमोल सरडे, महावीर बलटे, आकाश वाल्मिकी, महंमद हनिफ, शौकत शेख यांच्या पथकाने केली.