बांगलादेशात दोन रेल्वेगाड्यांची समोरासमोर धडक

15 जणांचा जागीच मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी

ढाका : बांगलादेशात सोमवारी दोन रेल्वेगाड्यांमध्ये धडक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात सुमारे 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवशांना गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा दोन प्रवासी वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.

बांगलादेशच्या ब्राह्मणबेरिया जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली. अपघाताच्या वेळी उदयन एक्‍स्प्रेस प्लॅटफॉर्मकडे जात होती, त्यावेळी ही रेल्वे दुसऱ्या रेल्वेला धडकली. यात दोन डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा पोलिस प्रमुखांनी मृतांची संख्या पुष्टी केली आहे. अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत मृतांची संख्या आणखी वाढू शकते.

अपघातानंतर लवकरच बचाव आणि मदतकार्य राबविण्यात आले. घटनेचे कारण शोधून काढले जात आहे. स्थानिक सरकारी प्रशासक हयात उद दौला यांनी सांगितले की या घटनेत 40 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच वेळी बांगलादेशी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार त्यात सुमारे 100 लोक जखमी झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.