बांगलादेशात दोन ट्रेनची समोरासमोर टक्कर; 16 ठार, 50 जखमी 

ढाका: बांगलादेशातील ब्राह्मणबाडिया जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात किमान 16 जण ठार आणि 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दोन ट्रेनमध्ये समोरासमोर टक्कर झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  हा अपघात इतका गंभीर होता की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर ट्रेनमध्येएकच किंचाळ उडाली होती. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. अपघाताची माहिती मिळताच मदत व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. बचाव दलाने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान, जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून  या अपघातात 16 जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान शेख हसीना यांनी दुःख व्यक्त केले

यावेळी बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी शोक व्यक्त केला. घटनास्थळी भेट देताना रेल्वेमंत्री एमडी नूरुल इस्लाम सुजन यांनी मृतांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये मदत जाहीर केली तर जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटूंबांना 25 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

उपायुक्त हयात-उद-दौला खान यांच्या म्हणण्यानुसार, नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जणांचा मृत्यू वेगवेगळ्या रुग्णालयात झाला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख मोहम्मद अनीसुर रहमान यांनी सांगितले की, जखमींपैकी  28 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू असून अपघाताचे कारण शोधण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.